गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक ५/एप्रिल/ २०११ रोजी मी माझा
ब्लॉग क्रिएट केला. माझ नेहमीच असं होत. काळा वेळाचं मला कधीच भान राहात नाही. लोक चांगल्या गोष्टीं साठी गुढीपाडव्या सारखा पवित्र दिवस निवडतात. माझ मात्र नेहमी
प्रमाणे बैल गेला नी झोपा असच चाललंय ...... असो. पण खूप गम्मत वाटतेय.
आपला हि ब्लॉग आहे नी आपल्यालाही अनेकजणांशी मैत्री करता येईल याचाच खूप आनंद होतोय.
खूप छान छान लिहायला मी लेखक किंवा कवी नाही. थोडीशी चित्रकला येते. ती जे.जे. मध्ये
विद्यार्थ्यांना शिकविताना कामाला आली.
माझ्या ब्लॉग चे नामकरण करतांना काही सुचेना. शेवटी ज्या चित्ररथांनी मला जगासमोर आणले त्या चित्ररथांची आठवण झाली. आम्ही चित्ररथा वर जसे नेपथ्या सहित प्रसंग उभे करतो तसेच ब्लॉग वर देखील जीवनातल्या अनुभवाच्या शिदोरीवर
आधारित जमेल तसे रंग रूपा सहित शब्द मांडावेत असे मनात आले. म्हणून ब्लॉग चे नाव 'माझा चित्ररथ' असे ठेवले आहे. अर्थात माझ्या सारख्या आळशी माणसाला जसा मूड येईल तसा किंवा वेळ मिळेल तसा "माझा चित्ररथ" ब्लॉगवर मार्गक्रमण करणार आहे. धन्यवाद.